सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! मराठा समाजाच्या बैठकीत मोठा गोंधळ

  • संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाइफेक हल्ल्यानंतर सोलापुरात शासकीय विश्रामगृह येथे मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्ह्यातील मराठा बांधव उपस्थित होते. 
  • यावेळी अमोलराजे भोसले यांना एकेरी बोलण्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी मोठया प्रमाणात गोंधळ उडाला. अचानक हाणामारी सुरू झाल्याने काय झाले हे कोणालाच काही समजले नाही. लगेच शासकीय विश्रामगृह येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा आला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

Related Articles

Back to top button