- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज बारामती तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन केले.
- यावेळी त्यांनी बारामतीकरांशी संवाद साधला. परंतु, बेशिस्त बारामतीकरांना त्यांनी दम भरल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. हळूच ओव्हरटेक राँग साईडने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे, असा इशाराच यावेळी अजितदादा पवारांकडून देण्यात आला आहे. बारामतीमधील सावित्री हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर अजितदादा पवारांनी बारामतीकरांशी बोलताना हा दम दिला आहे.
- बारामतीकरता, इंदापूरकरता, महाराष्ट्राकरिता ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी महायुती सरकार करत आहे. पण आता यापुढे बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही.
- काही जण चुका करत आहेत. रस्त्यावर कचरा टाकत आहेत. जनावरे चरायला सोडत आहेत. मी त्यांना कृपा करून सांगतो, आता ती जनावरे कोंडवड्यात घातली तर ठीक, नाही ऐकले तर त्यांना बाजार दाखवतो, अशी समज अजितदादा पवारांकडून देण्यात आली आहे.
हळूच ओव्हरटेक करत राँग साईडने जाण्याचा प्रयत्न केल्यास टायरमध्ये घालून झोडायला सांगेन
