राजकीय
दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा

गुजरातचा निकाल बघता तो अपेक्षितच होता. कारण तिकडे आप व अन्य पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली असती तर नक्कीच भाजपला काटे की टक्कर द्यावी लागली असती. पण कदाचीत दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा असे काही तरी झाले असावे अशी लोकांना शंका आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
काल दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत १५ वर्षांपासून असलेली भाजप सत्ता आपने खेचून घेतली. बसपा, एमआयएम यांची मतविभागणी झाली नसती. तर आपला चांगला प्रकारे निकाल घेता आला असता. पण तरीही जे निकाल दिल्लीत आपला मिळाले आहेत, ते कौतुकास्पद आहेत.
कारण १५ वर्षांची सत्ता भाजपकडून खेचून घेणे सोपे काम नाही. दुसरा गुजरातचा निकाल बघता तो अपेक्षितच होता. कारण तिकडे आप व अन्य पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली असती तर नक्कीच भाजपाल काटे की टक्कर द्यावी लागली असती. पण कदाचीत दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा असे काही तरी झाले असावे, असा संशय लोकांना येऊ लागला आहे, असे राऊत यांनी सांगितले.



