क्राईम
ब्रेकिंग! स्वारगेट बसस्थानकामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा

- पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये मंगळवारी पहाटे एका 26 वर्षीय तरूणीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडडकीस आली. यानंतर आता राज्यभर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेनंतर सर्व नेते, मंत्री, पोलिस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. विरोधकांसह राज्यातील जनतेची मागणी नराधम दत्ता गाडेला कठोर शिक्षा करण्याची केली जात आहे. मात्र 48 तास ओलंडूनही तो सापडलेला नाही. या घटनेनंतर आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानकाला भेट दिली असता त्यांना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. त्यांचा ताफा तृप्ती देसाईंकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या देसाईंसह अन्य काही महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
- दरम्यान आता या प्रकरणात तृप्ती देसाई यांनी देखील उडी घेत थेट गृहराज्यमंत्री कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. कदम आज स्वारगेट बस बसस्थानकाला भेट देण्यासाठी आले होते. यानंतर देसाईंसह अन्य काही महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक अद्याप अटक झालेली नाही. तो शरण येण्याची वाट पोलिस पाहत आहेत का? लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले जात. राज्यात नेमकं काय सुरू आहे हे विचारण्यासाठी त्यांचा ताफा अडवल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.



