राजकीय

ब्रेकिंग! ठाकरे गटाची मोठी खेळी

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडीतून निवडणूक लढणार आहेत. या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिंदेंना चेकमेट करण्याची रणनीती आखली आहे. त्यानुसार, शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे यांना उतरवले जाण्याची शक्यता आहे.

कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे हे आमदार आहेत. मागील अनेक निवडणुकांपासून ते सहज निवडून येत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाण्यात त्यांनी आपले वर्चस्व राखले आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची सरशी झाली असली तरी ठाणे व कल्याणची जागा जिंकून शिंदे यांनी आपला दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले होते. मात्र आता विधानसभा निवडणुकीत खुद्द तेच मैदानात आहेत आणि त्यांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

केदार दिघे हे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. ते सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर केदार दिघे यांनी ठाकरेंनाच साथ देण्याचा निर्णय घेतला होता.

Related Articles

Back to top button