महाराष्ट्र

गर्भवती कवितासोबत अनर्थ घडला

सध्या राज्यात पलीकडे दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा गावातल्या एका महिलेला आरोग्य व्यवस्थेच्या बोजबाऱ्यामुळे जीव गमवावा लागला आहे. नादुरुस्त रुग्णवाहिकेमुळे या महिलेची प्रसुतीही रुग्णवाहिकेतच झाली आणि पुढे प्रसुतीमधील काही उणींवामुळे तिला गमवावा लागला आहे. बाळाला आयुष्य देवून जगाच्या निरोप घेणारी कविता ही शासनाच्या अनास्थेची शिकार झाली.
अतिदुर्गम भाग समजला जाणाऱ्या पिंपळखुटा गावातील राऊतपाडा पर्यंत पोहचणारा रस्ता खराबच आहे. कविताला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यानंतर कविता राऊत यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या पिपंळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपलब्ध नर्सने तिची तपासणी करुन मोलगी ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. यासाठी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रुग्णवाहिका देण्यात आली.
मात्र रुग्णवाहिका रस्त्यात एका चढावावर बंद पडली आणि कविताची रस्त्यामध्येच नादुरुस्त रुग्णवाहिकेत प्रसुती झाली. प्रसुती दरम्यान काही गुंतागुतींमुळे बाळाला जन्म दिलानंतर तिची प्रकृती खालावली. याठिकाणी अर्धातासानंतर यंत्रणेकडून मोलगी ग्रामीण रुग्णालयाची गाडी दाखल झाली. मात्र उपचारासाठी पुढे तिला ग्रामीण रुग्णालय मोलगी इथे नेल्यावर तिची प्रकृती पाहता तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय गाठण्याआधीच कविताने आपले प्राण सोडले.

Related Articles

Back to top button