क्राईम

तुझे तसले फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवेल, विवाहित महिलेला धमकी, मारहाण

  • पूर्वीच्या प्रियकराने भेटण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर त्या महिलेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ तिच्या पतीला व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे.
  • ही घटना शुक्रवारी घडली. सकाळी ११ वाजता पीडित विवाहित महिला शेंगदाण्याचे बिल आणण्यासाठी नाशिक शहरातील नाशिकरोड येथे आली होती. त्यानंतर तिच्या पूर्वीच्या प्रियकराने तिला नांदूर नाका येथे बोलावले. पीडिता त्याला भेटण्यासाठी गेली असता त्याने तिला जबरदस्तीने पिकअप व्हॅनमध्ये बसवून माडसांगवीजवळील लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
  • त्यानंतर दोघांमध्ये तू नवऱ्याकडे का गेली? या मुद्द्यावरून वाद झाला. आरोपीने पीडितेला मारहाण केली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वीच्या संबंधांचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या आणि तिच्या पतीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून तिचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
  • या प्रकारामुळे मानसिक तणावात आलेल्या पीडित महिलेने आत्महत्येचा इशारा दिला. त्यामुळे घाबरलेल्या आरोपीने तिला पुन्हा पिकअपमधून तिच्या माहेरी सोडून दिले.
  • सायंकाळी पीडिता आत्याच्या घरी असताना तिचा पती आणि मुलगी तेथे आले. पतीने मोबाईलवर आलेल्या फोटो-व्हिडीओंबाबत विचारणा केली असता पीडितेने सगळा प्रकार स्पष्ट केला. पतीने तिला धीर दिल्यानंतर पीडित महिला थेट नाशिकरोड पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
  • या तक्रारीच्या आधारे नाशिकरोड पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button