क्राईम
‘चल काम देतो’ म्हणत मुलीची दोन लाखांत विक्री

- राज्यामधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला कामाच्या बहाण्याने घेऊन जात तिची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देत तिचा गर्भपात करण्यात आला. या भयंकर घटनेने धक्का बसलेल्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या बातमीने राज्य हादरुन गेला आहे.
- कामाच्या बहाण्याने दोन महिलांनी जळगावमधील अल्पवयीन मुलीला नाशिक येथे घेऊन जात तिची कोल्हापूरमध्ये दोन लाखांमध्ये विक्री केल्याची घटना घडली. तसेच या महिलांकडून कोल्हापुरात एका व्यक्तीसोबत लग्न लावून तिचा गर्भपातही करण्यात आल्याची माहिती मुलीने घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना दिली आहे. मुलीला विकल्याच्या धक्क्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली असून सदर घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे.
- भैय्या रामदास पाटील असे आत्महत्या करणाऱ्या पित्याचे नाव असून मुलगी घरी आल्यानंतर सदर घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. मात्र, ती घरी परत आल्याने विक्री करणाऱ्या महिला व लग्न झालेल्या कुटुंबाकडून मुलीच्या कुटुंबाला धमक्या व पैशाची मागणी केली जात आहे, असा आरोपही भैय्या पाटील यांच्या भावाने केला आहे. याबाबत पोलिसात तक्रार देऊनही पोलिसांनी मात्र तक्रार न घेता या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.



