मनोरंजन

‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाचे निधन

  • बिग बॉस 13 फेम शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेफालीने वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 
  • ‘कांटा लगा’ या गाण्याने प्रसिद्ध झालेल्या शेफालीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात राहणारी अभिनेत्री शेफाली काल सकाळी गंभीर आजारी पडली. छातीत दुखू लागल्याने, तिचे पती पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. जिथे तिला पोहोचताच मृत घोषित करण्यात आले.
  • शेफाली खूप लोकप्रिय होती. तिचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. 2002 मध्ये तिने आशा पारेख यांच्या चित्रपटातील कांटा लगा या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ रिक्रिएट केला. हे गाणे ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात वापरले गेले होते. युट्यूबवर त्याला सुमारे 100 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. जेव्हा हे गाणे रिलीज झाले, तेव्हा त्याला खूप लोकप्रियता मिळाली.
  • शेफालीचा हा व्हिडिओ इतका हिट झाला की, तिला स्वतःला ‘कांटा लगा गर्ल’ असे संबोधले जाऊ लागले. तिने सलमान खानच्या लोकप्रिय शो ‘बिग बॉस 12’ मध्येही भाग घेतला. तिने तिच्या कारकिर्दीतील एकमेव हिंदी चित्रपट ‘मुझसे शादी करोगी’ केला. त्याचवेळी ती ‘हुडुगारू’ नावाच्या कन्नड चित्रपटाचा भाग होती. शेफालीच्या अचानक निधनाने मनोरंजन विश्वात आणि तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 

Related Articles

Back to top button