- राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत पाच वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत.
- या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे फडणवीस म्हणाले.
- फडणवीस यांनी या वीज दर कपातीच्या संदर्भात एक्स पोस्ट केली आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये फडणवीस यांनी म्हटले, साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर दहा टक्के वीज दरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी दहा टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील.
सर्वसामान्यांना लॉटरी! वीज दरात तब्बल दहा टक्के कपात
