क्राईम
राज्यात मध्यरात्री भीषण अपघात

- राज्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर स्वरूपात जखमी आहेत. धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिल्लोड रोडवर मध्यरात्री ही घटना घडली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कार भरधाव वेगात होती. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार डिव्हायडरला जाऊन धडकली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
- हे सर्व पाचही मित्र एका धाब्यावर जेवणासाठी फुलंब्रीला गेले होते. दरम्यान, परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. भरधाव कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याने कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कारमधील सर्व तरुण 15 ते 18 वर्षांचे होते. सध्या पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. जखमी तरुणांना नाना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे.



