क्राईम
ब्रेकिंग! बुरख्यात घरी आला तौफिक ‘भाईजान’

- तौफिक आणि नेहा दोघे एकमेकांना जवळपास तीन वर्षांपासून ओळखत होते. नेहा तौफिकला भाऊ मानत होती. त्याला ती राखी बांधत असे. पण, काही काळापासून तौफिकची नियत फिरली. तो तिच्याशी लग्न करण्याची जिद्द करत होता. नेहाला हे नाते मान्य नव्हते. नेहाने तौफिकला विरोध केला. तौफिकला हा विरोध सहन झाला नाही. त्याने 19 वर्षांच्या नेहाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिले.
- गंभीर जखमी झालेल्या नेहाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. दिल्लीतल्या ज्योती नगरमधील हा धक्कादायक प्रकार आहे.
- नेहाच्या आईने सांगितले की, तौफिक बुरखा घालून इमारतीमध्ये आला होता. त्याने ओढणीने नेहाचा गळा दाबला. आजूबाजूच्या लोकांना आरडाओरडा ऐकू आला, तेव्हा त्याने तिला पाचव्या मजल्यावरून खाली फेकले. लोकांना तिच्या किंकाळ्या ऐकू आल्या, पण दुर्दैवाने आम्ही पहिल्या मजल्यावर असल्यामुळे आम्हाला ऐकू आले नाही. नेहाला रुग्णालयात नेले तेव्हा तिच्या गळ्यावर खुणा होत्या. आम्हाला या प्रकरणामुळे खूप दु:ख झाले आहे. पोलिसांनी तौफिकला लवकरात लवकर पकडावे आणि कारवाई करावी.
- नेहाच्या वडिलांनी सांगितले की, तौफीक तिच्यावर बोलण्यासाठी दबाव आणत होता, पण ती त्याच्यामुळे त्रस्त झाली होती आणि त्याच्याशी बोलू इच्छित नव्हती. तो नेहाला धमक्याही देत असे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी तौफीक हा मुरादाबादचा रहिवासी असून तो फरार आहे. या प्रकरणी ज्योती नगर पोलिस ठाण्यात कलम 109(1)/351(2) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुरावे आणि गोळा करून आरोपीची ओळख पटवली आहे. त्याला पकडण्यासाठी अनेक पथके तैनात केली आहेत.



