मनोरंजन

काम मिळत नसल्याने अभिनेत्याने आपल्या जीवनाची दोर कापली

  • मराठी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. काम मिळत नसल्याच्या तणावातून एका कलाकाराने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. मराठी चित्रपट, मालिका, नाटक यातून विविध भूमिका साकारणारा अभिनेता आणि लेखक तुषार घाडीगांवकर याने आत्महत्या केली आहे. 
  • दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून तुषारच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.
  • लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, भाऊबळी, उनाड, झोंबिवली या चित्रपटांमध्ये तुषारने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना त्याची दखल घेण्यास भाग पाडले. सन मराठी या वाहिनीवरील सखा माझा पांडुरंग या मालिकेतही तुषार झळकला होता. चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवे याने तुषारच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
  • तुषार हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवणी येथील रहिवासी होती. त्याने नाटकातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने नाटक आणि चित्रपटात विविध भूमिका केल्या आहेत.
  • हा त्याचा प्रवास सुरू असतानाच त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने मराठी विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता वैभव मांगले, अभिषेक देशमुख, समीर पाटील यांनाही धक्का बसल्याच्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या आहेत.

Related Articles

Back to top button