देश - विदेश
ब्रेकिंग! जग युद्धाच्या उंबरठ्यावर; पण…

- सध्या जग युद्धाच्या उंबठ्यावर आहे. अशा काळात योगाची सर्वात जास्त गरज आहे. योगातून शांती मिळते. योग तणावातून समाधानाकडे घेऊन जातो. योग सर्वांचा आणि सर्वांसाठी आहे. या योगा आंदोलनात प्रत्येक व्यक्ती दिवसाची सुरुवात योगाने करेल. या आंदोलनात सर्व समाज योगामुळे एकत्र येईल. योग मानवतेला एका सुत्रात आणेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
- मोदी हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी योगाचे महत्व सांगितले. जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले, गेल्या दशकातील योगाच्या प्रवासाकडे पाहताना मला अनेक गोष्टी आठवतात. ज्या दिवशी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जावा, असा प्रस्ताव मांडला होता.
- या प्रस्तावानंतर जगभरातील १७३ देशांनी आपणास पाठिंबा दिला. आजच्या जगात असा पाठिंबा मिळणे ही सामान्य गोष्ट नाही. हा केवळ एका प्रस्तावाला पाठिंबा नव्हता, तर तो मानवतेच्या भल्यासाठी जगाचा सामूहिक प्रयत्न होता. आता ११ वर्षांनंतर आपण पाहतो की योग जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे.



