देश - विदेश
मोठी बातमी! इराणची संपूर्ण जगालाच धमकी

- इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना आता इराणने संपूर्ण जगालाच मोठी धमकी दिली आहे. या युध्दाचा जगाला मोठा फटका बसणार असून यात भारतालाही झळ बसण्याची शक्यता आहे.
- इस्त्रायलसोबतच्या संघर्षादरम्यान इराणने होर्मुजची सामुद्रधुनीतून जाणारा मार्ग बंद करण्याची धमकीच जगाला दिली आहे. विशेष म्हणजे, अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने लढल्यास होर्मुज सामुद्रधुनी मार्ग बंद करण्याची धमकीच इराणकडून देण्यात आली आहे.
- जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचे वर्चस्व आहे. विशेष म्हणजे आखाती देशांमधून याच सामुद्रधुनीतून बहुतांश देशांना खनिज तेलाचा पुरवठा केला जातो. तसेच भारतालाही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. संपूर्ण खनिज तेलाचा पुरवठा याच सामुद्रधुनीतून होतो. त्याचाच परिणाम म्हणून भारतालाही व्यापाराची झळ बसू शकते. त्यामुळे आता इराण-इस्त्रायल युध्दात अमेरिकेने प्रत्यक्ष सहभाग घेतल्यास जगातील सगळ्यात महत्त्वाचा सागरी मार्ग म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी बंद करू, असा थेट इशाराच इराणने जगाला दिला आहे.



