देश - विदेश

ब्रेकिंग! इस्रायल-इराण तणाव अन् भारतीय गुंतवणूकदारांनी कमावले पाच लाख कोटी

  • इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारात देखील घसरण पाहायला मिळत होती मात्र आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. बाजारात आज गुंतवणूकदारांनी पाच लाख कोटी रुपये कमावले आहे. आज बाजाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सने 800 पेक्षा जास्त अंकांची उडी घेत 81,354 च्या पातळीवरून 82,297 च्या शिखरावर पोहोचला. तर निफ्टी देखील 24,787 वरून 25,078 ला पोहचला होता. 
  • तर दुसरीकडे आज सेन्सेक्स 1046.30 अंकांच्या वाढीसह 82,408.17 वर बंद झाला. तर निफ्टी 25,112,40 वर बंद झाला.
  • इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असणाऱ्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून घसरण पाहायला मिळत होती. ज्यामुळे अनेक शेअर्स स्वस्त झाले होते. त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळाली.

Related Articles

Back to top button