ब्रेकिंग! राज्यात पावसाचा जोर वाढणार

हवामान विभागाने 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान परतीचा मान्सून सुरू होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र पुढील दोन दिवस कोकण-गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने परतीचा मान्सून 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान सुरू होण्याचा अंदाज वर्तविला आहे. महत्त्वाचे म्हणजे परतीच्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामातील पिकांच्या शेवटच्या टप्प्यातील कामकाजात गुंतलेले आहेत.



