पहलगाममध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक पाऊले उचलली आहेत. दरम्यान गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्याच्या हातात लाल रंगाची ‘गुप्त’ फाईल होती. पहलगाम हल्ल्यानंतर तातडीने राष्ट्रपती भवनात बैठक झाल्याने बैठकीची वेळ आणि दोन्ही मंत्र्यांची बाँडीलँग्वेज पाहता, पाकिस्तानचे टेन्शन वाढले असणार आहे. त्या फाईलमध्ये पाकिस्तानविरुद्धची आक्रमक रणनिती असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानची चहूबाजुने कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचेही सांगितले जात आहे.
पाकिस्तानविरुद्धची आक्रमक रणनीती असणाऱ्या या फाईलवर राष्ट्रपतींनी सही केली का? हे दोन्ही मंत्री राष्ट्रपतींकडे कशाची मंजुरी घेण्यासाठी गेले होते? हे प्रश्न सध्या चर्चेत आले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत अॅक्शन मोडमध्ये आहे. परराष्ट्र मंत्रालयापासून ते गुप्तचर संस्थांपर्यंत सर्वजण पाकिस्तानला घेरण्याची तयारी करत आहेत. आता ही लाल फाईल राष्ट्रपतींच्या हातात असल्याने, काहीतरी मोठे घडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.