महाराष्ट्र

ब्रेकिंग! बोगस लाडक्या बहिणींची पोलखोल होणार, इन्कम टॅक्स डेटा देणार

  • सध्या लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेअंतर्गत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे उघड होत असून राज्य सरकारकडून सध्या लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी सुरू आहे. येत्या काळात हजारो महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची शक्यता असून आयकर विभागाच्या डेटाच्या आधारे ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
  • राज्य सरकारकडून आयकर विभागाशी संपर्क साधून महिलांचे उत्पन्न तपासले जात आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत सुमारे दोन लाख अर्जांची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये दोन हजारपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिला लाभार्थ्यांमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे.
  • लाभार्थी महिलांपैकी 2.30 लाख महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत, 1.10 लाख महिलांचे वय 65 पेक्षा जास्त आहे, तर 1.60 लाख चारचाकी वाहनधारक लाभार्थी आहेत. याच सोबत नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी 7.70 लाख इतके आहेत. सध्या राज्य सरकारच्या माहितीनुसार दोन हजारपेक्षा जास्त लाभार्थी महिला सरकारी सेवेत कार्यरत आहेत. या आधारावर राज्य सरकारकडून सध्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे.
  • या योजनेत सुमारे 2 कोटी 65 लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सध्या सुमारे 2.5 कोटी महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. मात्र, सर्व अटी व शर्तींच्या आधारे प्रत्यक्षात फक्त सुमारे 1 कोटी 20 लाख महिला या योजनेस पात्र ठरू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Back to top button