सोलापूर

ब्रेकिंग! हवामान खात्याकडून अचानक नवा अलर्ट

  • राज्याला पावसाने हाहाकार माजवला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा तसेच पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. 
  • सोलापूर जिल्ह्यात सरासरी 32 मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र, आत्ताच 171 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे सात पट पावसाची क्षमता वाढली आहे. आगामी पंढरपूरच्या वारीत देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन प्रणाली कार्यरत असणार आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
  • दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासात आपल्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. मंत्रालय, असा मेसेज प्रत्येक सोलापूरकरांच्या मोबाईलवर आला आहे.

Related Articles

Back to top button