क्राईम
माझ्याशी लग्न कर…महिलेचा हट्ट; प्रियकराच्या मनात राग, गाडीवर बसून नेले आणि दोन मुलांसह…

- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे (ता. शिरूर) येथे तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला. 25 वर्षीय तरुणी आणि दोन चिमुकल्यांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. या तीनही मृतांना जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान पोलिसांनी कसून तपास सुरू आहे. तर आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती हद्दीत घडलेल्या महिला आणि दोन चिमुकल्यांच्या अर्धवट जळालेल्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना मोठं यश आलं आहे. अनैतिक संबंधातून विवाहाचा तगादा लावल्यानेच नातेवाईक मयत महिला अन तिच्या दोन मुलांची निर्घृण हत्या झाल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तर या घटनेमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे हा आरोपी त्या मृत महिलेचा जिचे नाव स्वाती सोनवणे असे आहे हिचा तो बहिणीचा नवरा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
- गोरख बोखारे (वय ३६) या आरोपीला अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली आहे. हत्या झालेल्या महिलेसह तिची दोन चिमुकली मुलं ज्यांची नावे ही स्वराज (२) आणि विराज (१) अशी तिघांची ओळख पटली आहे. दरम्यान, ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस, मुख्य महामार्गालगत हे मृतदेह आढळून आले होते. या मृतांमध्ये चार वर्षांच्या मुलाचा व दीड वर्षांच्या छोट्या बाळाचा समावेश असल्याचची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न झाली होती.
- दरम्यान मृतदेह इतके जळाले होते की, त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. मात्र, यातील मयत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू आढळून आल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा सापडला होता.



