महाराष्ट्र

औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारतात…

  • छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात संभाजीराजेंचे शौर्य दाखवण्यात आले आहे. तसेच औरंगजेबाने संभाजीराजेंना कसे छळले, हेही दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत असतानाच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी धक्कादायक विधान केले आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, अशी स्तुतीसुमने आझमींनी उधळली. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असेही ते म्हणाले.
  • राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. सपा नेते आझमी यांनीही अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेशापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होती, तो २४ टक्के होता. भारताला ‘सोने की चिडीया म्हटले जायचे. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचे म्हणू का, असा सवाल आझमींनी केला.

Related Articles

Back to top button