सोलापूर

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातही ‘तेच’

  • पुण्यात वैष्णवी हगवणेंचे प्रकरण ताजे असताना सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैष्णवीप्रमाणेच सोलापुरात आशाराणी भोसले हिचा सासरच्यांकडून छळ करण्यात आला. यातून तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिने आत्महत्या केली तेव्हा ती तीन महिन्यांची गर्भवती होती. आशाराणीची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून आशाराणीने टोकाचे पाऊल उचलले.
  • सासरच्या मंडळींनी पैसे आणि चार चाकी वाहनासाठी छळ केल्यानेच मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचे आशाराणीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. आशाराणी हिने गळफास घेतल्यानंतर तिला मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. आशाराणी हिला तीन वर्षाची मुलगी आहे. तसेच ती तीन महिन्याची गरोदर असल्याचे नातेवाईकांकडून सांगितले जात आहे.
  • आाशाराणी हिला सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्यामुळे चार ते पाच वेळा माहेरच्या मंडळींनी त्यांच्यातील घरगुती वाद मिटवला होता. आशाराणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मृत आशाराणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button