खेळ

बिग ब्रेकिंग! विराट कोहलीची स्वप्नपूर्ती

  • अखेर आज आयपीएल 2025 ला नवा विजेता मिळाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा फायनल सामना झाला. 
  • दोन्ही टीमने यापूर्वी एकदाही आयपीएल विजेतेपद पटकावले नव्हते. त्यामुळे ही फायनल दोन्ही टीमसाठी खास होती. त्यामध्ये अखेर आरसीबी यशस्वी ठरली आहे. आरसीबीने पंजाबचा रन्सने पराभव करत विजेतेपदाचे स्वप्न अखेर पूर्ण केले. आरसीबीनं पंजाब किंग्जचा 6 रनने पराभव करत विजेतेपद मिळवले.
  • आरसीबीने पहिल्यांदा बॅटिंग करताना 9 आऊट 190 रन्स केले. 191 रन्सचा पाठलाग करत असताना पंजाब किंग्जला चांगल्या सुरुवतीची गरज होती. पंजाबने आक्रमक पद्धतीने सुरुवात केली. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंहने पहिल्या विकेटसाठी 43 रन्सची पार्टनरशिप केली.
  • जोश हेजलवुडने ही जोडी फोडली. फिल सॉल्टने प्रियांश आर्याचा भन्नाट कॅच घेत आरसीबीला पहिले यश मिळवून दिलं. त्यानंतर आरसीबीने मॅचमध्ये कमबॅक केले. प्रभसिमरन सिंह 26 रन्स काढून आऊट झाला. तर रोमारियो शेपर्डने पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यरला फक्त एक रनवर आऊट करत पंजाबला मोठा धक्का दिला. पंजाबला कॅप्टन श्रेयसकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, फायनलमध्ये त्याने निराशा केली.

Related Articles

Back to top button