क्राईम

खून का बदला खून

  • खून का बदला खून. बापाच्या खूनचा बदला मुलाने घेतला. हे सर्व चित्रपटाला शोभेल असेच आहे. पण असे प्रत्यक्षात घडले असेल तर. होय असे प्रत्यक्षात घडले आहे. खून का बदला खून याचा थरार सांगलीकरांना अनुभवला आहे. 2021 साली बापाच्या खूनाचा बदला मुलाने खूनानेच घेतला आहे. त्यामुळे सांगली शहर हादरून गेले आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्याने खून का केला याची कबुलीही दिली आहे.
  • 2021 साली महेश कांबळे याने फिरोज शेख यांचा पैशाच्या देण्या घेण्यावरून खून केला होता. या खून प्रकरणी महेश याला अटकही करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षानंतर म्हणजेच 2023 साली महेश हा जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने शहरात भाजीचे दुकान टाकले. त्यात तो कोथिंबीर विक्रीचा व्यवसाय करत होता. महेश बाहेर आला आहे, याची कल्पना फिरोज शेख याचा मुलगा मुजाहिद याला समजली होती. तो संधीच्या शोधात होता.
  • मुजाहिदच्या मनात सुडाची भावना होती. बापाचा खून केलेला खूनी बाहेर फिरतोय हे त्याला पचत नव्हते. त्यामुळे त्याच्या मनात प्रचंड राग होता. शिवाय महेश याचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचेही मुजाहिद याला समजले होते. त्यामुळे तो आणखीनच चिडला होता. खूनाचा बदला घेण्यासाठी साथीदाराच्या मदतीने तो संधी शोधत होता. गुरुवारी सकाळी कोथिंबीर खरेदी केल्यानंतर महेश गाडीवरून शंभर फुटीमार्गे निघाला होता.
  • त्यावेळी तो लघुशंकेस थांबला होता. हीच संधी साधत मुजाहिद आणि त्याच्या साथीदाराने महेशवर हल्ला केला. यात महेश गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत त्याचा मृत्यूही झाला. पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह शंभर फुटी रस्त्यावर दिसून आला. याप्रकरणी पोलिसांनी मुजाहिद व मुजाहिदच्या साथीदाराला अटक केली आहे. त्याने बापाच्या खूनाचा बदला घेतल्याचे मान्य केले.

Related Articles

Back to top button