क्राईम
ब्रेकिंग! पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी अपडेट

- पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. आता या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पहलगाममधील दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून कमांड मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याचे नेतृत्व स्वत: पाकिस्तानी दहशतवाद्याने केले असल्याची माहिती मिळाली आहे. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 पेक्षा अधिक जखमी असल्याचे वृत्त आहे. या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ माजली आहे.
- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्व स्वतः पाकिस्तानी दहशतवाद्याने केले होते. या हल्ल्यात जवळपास सहा दहशतवादी सहभागी होते. या दहशतवाद्यांकडे AK-47 सारख्या रायफल होत्या.
- गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे तथ्य समोर आले आहेत. या दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्व पाकिस्तानी दहशतवादी स्वतः करत असल्याचे उघड झाले आहे. त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांमध्ये किमान एका परदेशी दहशतवाद्याचाही समावेश होता. हे दहशतवादी आधुनिक शस्त्रास्त्रांसह एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आधुनिक उपकरणे देखील सज्ज असल्याचे उघड झाले आहे. या दहशतवाद्यांनी कदाचित या भागाची रेकीही केली असेल.



