क्राईम
मेहुणीसोबत रात्रभर वाद, तो सटकला

- देशात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या मेहूणीची हत्या केली. हत्येनंतर त्याने मेहूणीचे धडावेगळं मेहूणीचं मुंडक हातात घेऊन तो गावभर फिरला; जयजयकार गेला, भयंकर घटनेने खळबळकेलेले शिर आणि तलवार हातात घेऊन गावात फेरफटकाही मारला. बिमल मंडल असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
- याबाबत सविस्तर माहिती अशी की, पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बसंती पोलीस स्टेशन परिसरातील भरतगडमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. बिमल मंडल या व्यक्तीने आपल्या मेहुणीची हत्या करून तिचा शिरच्छेद केला. एवढेच नाही तर त्यानंतर एका हातात मेहुणीचे कापलेले डोके आणि दुसऱ्या हातात धारदार शस्त्र घेऊन तो रस्त्यावर फिरत होता.
- स्थानिक लोकांच्या मते, यावेळी आरोपी बिमल मंडलच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. त्याने शांतपणे आणि सहजतेने हे घृणास्पद आणि भयानक कृत्य केले. काही लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. रस्त्याने जाणाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की आरोपी स्वतः पोलिस ठाण्याकडे जात आहे. पोलिसांनी त्याला तिथे ताब्यात घेतले. दरम्यान पोलिस चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.
- पोलिसांनी कापलेले डोके आणि हत्येसाठी वापरलेले शस्त्र ताब्यात घेतले. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात बिमल आणि त्याच्या मेव्हणीमधील दीर्घकाळापासूनच्या कौटुंबिक तणावाची बाब समोर आली आहे. तपासात पोलिसांना हत्येपूर्वी घरात भांडण झाल्याचे कळले, त्यानंतर आरोपीने हे भयानक आणि घृणास्पद कृत्य केले.



