राजकीय

पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचा खळबळजनक खुलासा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीनं फोन करून पवारांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीला आज पोलिसांनी अटक केली आहे. नारायण कुमार सोनी, असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून त्याला बिहारमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. 

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता चौकशीतून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आरोपी हा दहा वर्ष पुण्यात वास्तव्याला होता. या काळात त्याच्या पत्नीने त्याला सोडलं व दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं. पवार यांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई न केल्यानं आपण त्यांना फोन करत होतो, असा दावा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या व्यक्तीकडून करण्यात आला आहे. या पूर्वीही याच व्यक्तीने पवारांना धमकी दिल्याचं सांगण्यात आलं होतं.

Related Articles

Back to top button