क्राईम

सोलापूर! चाटला चौक भवानी पेठ येथे राडा

  • सोलापूर (प्रतिनिधी) लोकांची गर्दी पाहून नवदुर्गा माता मंदिर येथे फिर्यादी तनवीर ईलाही शेख (वय-३३, रा. कुमार स्वामी सोसायटी ,मित्र नगर, शेळगी) यांच्या ओळखीचे योगीराज हुबळीमठ यांना कसली गर्दी जमा झाली आहे. असे विचारून दुकानाकडे जात असताना अनोळखी पाच ते सहा इसम यांनी विनाकारण शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केल्याची घटना १६ मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चाटला चौक भवानी पेठ येथे घडली.
  • याप्रकरणी तनवीर शेख यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून अनोळखी पाच ते सहा हे इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोसई.बामणे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button