क्राईम
जावयाने केला सासऱ्याचा खून

- मद्यधुंद सासऱ्याने केलेल्या शाब्दिक वादाला उत्तर देताना जावयाने केलेल्या बेदम मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव रमेश पोचम दुर्गे असे असून आरोपी जावयाचे नाव चंद्रशेखर हिरालाल पवार असे आहे. अहेरी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
- पोलीस विभागानी दिलेल्या माहितीनुसार रमेश दुर्गे यांची मुलगी आणि जावई हे कर्नाटकात वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वीच ते महागावला आले होते. शनिवारी सायंकाळी रमेश यांनी मद्यधुंद अवस्थेत जावयाशी ‘इथे कशासाठी आला आहात?’ असा सवाल करत वाद घातला. वादाचे पर्यवसान उग्र भांडणात झाले. त्यावेळी चंद्रशेखरने सासऱ्याला बेदम मारहाण सुरू केली.
- मारहाण इतकी जबरदस्त होती की, जावयाने सासऱ्याच्या डोळ्यावर, छातीवर, पाठीवर आणि तोंडावर लाथाबुक्क्यांचा मारा केला. भांडण सोडवण्यासाठी धावलेल्या पत्नीसमोरच ही मारहाण सुरू होती. या हल्ल्यात सासरा रस्त्याच्या कडेला कोसळला. पण एवढ्यावर न थांबता चंद्रशेखरने सासऱ्याला पुन्हा बेदम मारहाण करत त्यांचा जीव घेतला.
- पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आरोपी चंद्रशेखरला ताब्यात घेतले आहे.



