मनोरंजन
ब्रेकिंग! ‘छावा’ चित्रपटावर बंदी घाला, तरुणांची माथी भडकवून दंगली होतायत

- सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेला ‘छावा’ चित्रपट हा नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. मुघल बादशाह औरंगजेबाच्या चित्रणावरून काही मुस्लिम धर्मगुरूंनी हा चित्रपट देशात तणाव निर्माण करत असल्याचा आरोप करत बंदीची मागणी केली आहे.
- ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून ‘छावा’ चित्रपटावर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ‘छावा’ चित्रपटात मुघल बादशाह औरंगजेबाचे जे स्वरूप दाखवले आहे, त्यामुळे देशातील तरुणांची माथी भडकवली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून नागपूर शहरात नुकत्याच उसळलेल्या दंगलीसाठी हा चित्रपटच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
- रझवी यांच्या मते, चित्रपटात इतिहासाचे विकृत चित्रण केल्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत असून अशांततेचे वातावरण पसरले आहे. यावर कठोर कारवाई करत फक्त चित्रपटावर बंदीच नव्हे, तर त्याचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.



