देश - विदेश

ठाकरेंनी अखेरच्या क्षणी पत्ते केले ओपन

सत्ताधाऱ्यांकडून संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्यात आल्यानंतर संसदेत त्यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर या विधेयकावर मतदान पार पडले. त्यामध्ये विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली तर 232 मते विधेयकाच्या विरोधात पडले. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत गुरुवारी मध्यरात्री बहुमताने पास झाले. विधेयकावरील मतदानाच्या वेळी एक राजकीय घडामोड घडली, ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अखेरच्या क्षणी पत्ते ओपन इंडिया आघाडीला साथ देत विधेयकाच्या विरोधात मतदान केले.

काल तब्बल 11 ते 12 तास या विधेयकावर चर्चा झाली. त्यामध्ये विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला या मुद्द्यावर धारेवर धरले तर सत्ताधारी पक्षाने देखील या विधेयकाच्या बाजूने जोरदार बॅटींग केली.

विधेयकावरील चर्चेत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाग घेतला. त्यांनी सरकारच्या हेतूंवर संशय व्यक्त केला. मी संयुक्त संसदीय समितीत होतो पण दुर्दैवाने या समितीमध्ये विधेयकातील तरतुदींवर, त्यातील कलमांवर सविस्तर चर्चाच झाली नाही, असे सावंत यांनी सांगितले. 

Related Articles

Back to top button