सोलापूर

सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. विविध बैठका व भेटींच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी केली जात आहे. सोलापुरात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. मात्र त्यातच काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरणारी घटना आज सकाळी सोलापुरात घडली.
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची समजते. रविवारी सकाळी काँग्रेस भवन येथे हा धक्कादायक प्रकार घडला. शहरातील काँग्रेस भवनमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाला सुरुवात झाली. परंतु राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे व सुभाष वाघमारे यांच्यात वादावादी झाली.
एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही तर हे प्रकरण हमरी तुमरी पर्यंत गेली.

  1. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे कार्यक्रम संपल्यानंतर काँग्रेस भवनातून बाहेर पडल्या. हा कार्यक्रम संपताच बंदपट्टे व वाघमारे यांच्या समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाली. तसेच तुफान मारामारी करण्यात आली. परिणामी काँग्रेस भवनात मोठा गोंधळ उडाला. अखेर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी हस्तक्षेप केल्यामुळे या वादावर पडदा पडला. मात्र काँग्रेस भवन मध्ये झालेल्या या प्रकाराची चर्चा संपूर्ण शहरात चांगलीच रंगली होती.

Related Articles

Back to top button