महाराष्ट्र

बदलापूर शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब

  1. बदलापूर शाळेतील चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बदलापूर शाळेतील मागील 15 सीसीटीव्हीचे दिवसांचे फुटेज गायब झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची बाब शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून समोर आल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली.
    शाळेच्या मॅनेजमेंटला जर याबद्दल माहिती असेल आणि त्याचा या प्रकरणात काही सहभाग असेल तर त्याच्यावर जबर कारवाई केली जाईल, असे केसरकर म्हणाले.
    प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावणे अत्यंत आवश्यक आहे. या शाळेतील 15 दिवसाचे रेकॉर्डिंगही गायब आहे. त्याची चौकशी सुरु आहे. शाळांमध्ये मदतकक्ष सुरू करत आहेत. शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून ही बाब समोर आली आहे. 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. सध्या आम्ही फक्त वस्तूस्थिती तपासतोय आणि पोलिसांना पुढील तपासासाठी अहवाल देत आहोत, असे केसरकर म्हणाले.

Related Articles

Back to top button