राजकीय

ब्रेकिंग! विनोद तावडेंनी पैसे वाटले?

  • राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली आहे. आता सोलापूरसह अन्य भागात उद्या मतदान होणार आहे. तर शनिवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, प्रचार थांबला असला तरी पक्ष आणि उमेदवार छुप्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत. आहे. तर काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याचाही आरोप होत आहे. असाच काहीसा प्रकार विरारमध्ये पाहायला मिळाला.
  • विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून जोरदार राडा झाला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
  • विरारच्या विवंता हॉटेलमध्ये बसलेले असताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरले. एका बॅगेतून पैशांची पाकीटं काढत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना तावडेंसमोर दाखवली. तसेच ही बॅग तावडेंची असल्याचा आरोपही बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
  • घटनेच्या वेळी पोलीस देखील तेथे उपस्थित होते. मात्र, पोलिसांना देखील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली. घटनेची माहिती मिळतात बविआचे आमदार क्षितीज ठाकूर घटनास्थळी पोहोचले आणि तावडेंना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. ठाकूर यांनी एक डायरी दाखवत त्यात काही नोंदी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

Back to top button