देश - विदेश
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात सेलिब्रेशन!

- पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सतत वाढत आहे. या हल्यानंतर देशभरात संताप आहे. लोक रस्त्यावर उतरून पाकिस्तानचा निषेध करू लागले आहेत. असे असताना आसाममध्ये मात्र काही जण आनंद व्यक्त करत होते. आसाम पोलिसांनी अशा १६ जणांना अटक केली आहे.
- अटक करण्यात आलेल्यांमध्ये राज्य विरोधी पक्ष एआययूडीएफचे आमदार अमिनुल इस्लाम यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ट्विटरवर लिहिले की, या लोकांवर कडक कारवाई केली जात आहे. गरज पडल्यास त्यांच्यावर एनएसए अंतर्गत कारवाई केली जाईल.
- मुख्यमंत्री सरमा म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतेही साम्य नाही. दोन्ही शत्रू देश आहेत आणि आपण असेच जगले पाहिजे. त्यांनी असेही म्हटले की, आसाम सरकार कोणत्याही किंमतीत देशविरोधी कारवाया सहन करणार नाही. या घटनेनंतर, देशाच्या अनेक भागात राहणारे देशद्रोही घटक पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आनंद व्यक्त करत आहेत. अशा लोकांवर सतत कारवाई केली जात आहे.



