सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! भावाला राखी बांधायला गेलेली संगीता दोन लेकरांसह बेपत्ता

सोलापुरात गुन्हेगारी वाढत आहे. दरम्यान, आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी गेलेली विवाहित महिला दोन मुलांसह बेपत्ता झाल्याची घटना सोलापूर शहरात घडली आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात पतीने आपली पत्नी व मुले बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
संगीता नामदेव पवार (वय ३५), वैष्णवी पवार (वय – १२), सोहम पवार (वय १०,सर्व रा.मु.पो. प्रताप नगर तांडा विजापुर रोड सोलापुर) असे बेपत्ता झालेल्याची नावे आहेत.
सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात राहणारी संगीता पवार ही दि. 30 ऑगस्ट रोजी भावाला राखी बांधण्यासाठी जाते म्हणून गेली होती. ती दोन मुलांसह राहत्या घरातून बोरामणी तांडा येथे भावाला राखी बांधुन येथे असे सांगून सोबत मुलगी वैष्णवी व मुलगा सोहम यांना घेऊन गेली होती.
राखी बांधण्यासाठी गेलेली संगीता अजून घरी आली नाही. नातेवाईकांनी मित्र, मैत्रिणी सर्व नातेवाईक व इतर ठिकाणी शोध घेतला असता ती मिळून न आल्याने पती नामदेव मनोहर पवार यांनी पत्नी व मुले बेपत्ता झाल्याची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात केली आहे. 

Related Articles

Back to top button