क्राईम
तुमची मुलगी मला द्या, गुंडाची शिक्षकाला धमकी

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरपगावमध्ये एका शिक्षकावर गावगुंडाकडून कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तुमची मुलगी मला द्या, अशी मागणी करत गुंडाने शिक्षकाला मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून त्यांना गंभीर जखमी केले.
जखमी शिक्षकाचे नाव बाजीराव डोईफोडे असून, सध्या त्यांच्यावर बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिक्षकाच्या कुटुंबाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आम्हाला न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू.



