क्राईम

बिग ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

  • जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. पहलगाममधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात हा हल्ला झाल्याचे सांगितले जात असून यात काही पर्यटक जखमी झाले आहेत. सध्या या ठिकाणी सुरक्षा दलाकडून दहशवाद्यांचा शोध घेतला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला आहे.
  • हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील एका पर्यटन स्पॉटवर आज दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. यात किमान चार पर्यटक जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
  • हे पर्यटक राजस्थानहून आल्याचे समोर आले आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यातील वरच्या भागात हा गोळीबार झाला असून या घटनेनंतर सुरक्षा दलांकडून परिसरात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना आहे.

Related Articles

Back to top button