मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना

भाजपच्या नेत्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. राज्यपाल कोश्यारींनी गडकरी यांच्यासोबत शिवाजी महाराजांची तुलना केली होती. हा वाद शमत नाही तोवर भाजपच्याच आणखी एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या शौर्याची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीशी करण्यात आली आहे. भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा आता चांगलेच चर्चेत आले असून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
प्रतापगड किल्ल्यावर आज शिवप्रताप दिन साजरा करण्यात येत आहे. यासाठी गडावर भव्य कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने शिंदे आणि लोढा उपस्थित होते.
यावेळी लोढा यांनी, शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची तुलना शिंदे यांच्या बंडखोरीशी केली आहे. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना डांबून ठेवलं होतं. पण ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. तसंच, मुख्यमंत्री शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं. पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं लोढा म्हणाले.



