क्राईम

लिव्ह इन पार्टनर प्रेयसीचा खून, नंतर मित्राला कॉल…

  • एका घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. एका मुलीची लग्नाला नकार दिल्याच्या रागातून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरूणानेच हत्या केल्याचे समोर आले.
  • त्यानंतर त्या तरुणाने तिची हत्या करून स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले होते. 
  • 27 वर्षीय सतीश मारुती यादवने याबाबतची कल्पना आधीच आपल्या मित्राला दिली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. मंगळवारी कोल्हापूरमध्ये पन्हाळा येथील प्रेयसीची हत्या करण्याआधी सतीश यादवने मित्राला फोन केला आणि अवघ्या अर्ध्या तासात प्रेयसीचा खून करून तो त्या ठिकाणावरून निघून गेला. त्यानंतर बुधवारी सकाळी त्याने शाहूवाडी तालुक्यातील कातळेवाडी बांद्रेवाडीत धरणाजवळ झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवले.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय लिव्ह इनमधील प्रेयसी समीक्षा भारत नरसिंगेची हत्या करण्यापूर्वी प्रियकर सतीश यादव हा मंगळवारी मोबाइलवरून मित्रांच्या संपर्कात होता. त्या दिवशी सकाळपासूनच तो दारूच्या नशेत होता. दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्याचा मित्र प्रकाश सुळेकरला फोन केला. फोनवरून त्याने समीक्षाची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या करणार असल्याचे त्याने मित्राला सांगितले. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच त्याने सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरामध्ये समीक्षाची चाकू भोसकून हत्या केली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू अंपले या दोघींना घरात कोंडून सतीश हा दुचाकीवरून निघून गेला.
  • समीक्षावर वार केल्यानंतर सतीशने बाजार भोगाव या ठिकाणी राहत असलेल्या एका मित्राकडून 200 रुपये घेतले. त्याने त्या पैशाने दुचाकीत पेट्रोल भरले आणि तो शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथे मित्र अरुण सुतारच्या घरी गेला. त्यानंतर बुधवारी कोणी उठायच्या आतच दुचाकी घेऊन घरातून निघून गेला. त्यानंतर काही वेळाने पोलिसांचे एक पथक नांदारीत सुतारच्या घरी सतीशचा शोध घेण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी अरुण सुतारला सोबत घेऊन दिवसभर सतीशचा शोध घेतला. पण, तो कुठेही सापडला नाही. अखेर गुरुवारी सकाळी तो गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Related Articles

Back to top button