सोलापूर हादरले! प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर झाडली गोळी

Admin
1 Min Read
  • सोलापूर शहरातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली असून शहरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
  • आज रात्री साडे आठ वाजण्च्या दरम्यानात ही घटना त्यांच्या सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी असलेल्या बंगल्यात घडली असल्याची माहिती समोर येत आहे. सदर बाजार पोलिसातील सूत्रांनी याला दुजारा दिला आहे. अशी माहिती मिळत आहे की, डॉक्टर वळसंगकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबीयांनी तातडीने त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशानभूमी जवळील वळसंगकर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्या ठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. डॉ. वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.
Share This Article