‘बेशरम रंग’ गाणे कॉपी केल्याचा पाकिस्तानचा आरोप

‘पठाण’चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत. दरम्यान, अशातच आता पाकिस्तानी गायक सज्जाद अलीने यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
अलीने पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाणं कॉपी केल्याचा आरोप केला आहे. सज्जादच्या मते, हे गाणं ‘अब के हम बिछडे’ या जुन्या पाकिस्तानी गाण्याशी मिळत-जुळत आहे. बेशरम रंग हे गाणं कॉपी केलेलं आहे. सज्जादच्या या आरोपावर अनेक जण कमेंट करु लागले आहेत. त्यातील एकाने लिहिलंय की, खरंच हे पठाणच्या बेशर्म गाण्यासारखे वाटत आहे. तर काही नेटकऱ्यांनी या दोन्ही गाण्यांना वेग-वेगळं कंपोजिशन असल्याचं म्हटलं आहे.