देश - विदेश

ब्रेकिंग! पुण्यातील विद्यार्थिनीने ऑपरेशन सिंदूरच्या अपडेटची केली पोस्ट

  • पुण्यातील 22 वर्षीय कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली हिला ऑपरेशन सिंदूरशी संबंधित सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या, या आरोपाखाली तिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिष्ठाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये एका विशिष्ट धार्मिक समुदायाविरुद्ध अपमानजनक टिप्पण्या होत्या. ऑपरेशन सिंदूरच्या अपडेटला प्रतिसाद म्हणून केलेली पोस्ट आता डिलीट करण्यात आली.
  • परंतु या क्लीपचा स्क्रीनशॉट आणि पोस्टमध्ये शेअर केलेला व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला, यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला. कोलकाता येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर, कोलकाता पोलिसांनी तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. अटक केल्यानंतर, पानोलीला शनिवारी कोलकाता येथील अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर, कोलकाता येथील पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत शर्मिष्ठा याच्याविरुद्ध शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.

Related Articles

Back to top button