राजकीय
निवडणूक प्रचारात मोदी शरद पवारांवर टीका करणे का टाळत आहेत?

- राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल पुण्यातील भाषेत महायुती सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. पुणेकरांसाठी असलेले व्हिजन मांडले, मराठीला अभिजात भाषा देणे, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा केलेला अपमान हे सर्व मुद्दे मांडले. मोदींनी पुण्यातील भाषणात काँग्रेसवर सर्वाधिक टीका केली. उद्धव ठाकरे सरकारला स्थगिती सरकार म्हणून टोला लगावला. राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंची
- प्रशंसा करायला लावा, असे उद्धव यांना आव्हान दिले. पण, ज्येष्ठ नेते शरद पवारांबद्दल एकही शब्द उच्चारला नाही.
- फक्त पुणेच नाही तर आजवर राज्यात झालेल्या सर्व प्रचारसभेत मोदींनी पवारांवर टीका करणे टाळले आहे. त्यामुळे मोदींच्या या मौनाचे कारण काय ? हा प्रश्न विचारला जात आहे.
- मोदींनी लोकसभा निवडणुकीत ‘अतृप्त आत्मा’ अशी टीका केल्यानंतर पवारांनी तो मुद्दा मोठा केला. हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा पवारांनी दिला होता. त्यानंतरच्या प्रचार सभेत पवारांनी सातत्याने हा टीकेचा मुद्दा मांडत लोकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला.
- या निवडणुकीत पवारांना कोणताही भावनिक मुद्दा द्यायचा नाही, असे मोदींनी ठरवले असावे. त्यामुळेच त्यांनी आत्तापर्यंत पवारांवर टीका करणे टाळले आहे.



