महाराष्ट्र
राज ठाकरे कुचक्या कानाचे, लोकसभेला गेम केला

- मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, उद्यापासून मी पाणी पिणे बंद करणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आंदोलनाची धग आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- या आंदोलनावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले, असा सवाल राज यांनी केला होता. यावरुन जरांगेंनी खरपूस टीका केली आहे.
- दोघे भाऊ चांगले. ब्रँड चांगला आहे. हा विनाकारण मराठ्यांच्या मध्ये पडतो. ११ ते १३ आमदार निवडून दिले. ते पळून गेले. आम्ही विचारले का. फडणवीसांनी लोकसभेला तुझा गेम केला. विधानसभेला तुझ्या मुलाला त्यांनीच पाडले. तरी आम्ही विचारले का. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकलेले पोरगं. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालते. हुरळून जातात. याला कुचक्या कानाचे म्हणतात. तुम्ही नाशिकला गेला. आम्ही विचारले का. पुण्याला गेला आम्ही विचारले का. तुम्ही संभाजीनगरला येता आम्ही विचारले का,



