बिजनेस
झकास! सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

- लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार भारतात चाचणी दरम्यान दिसून आली आहे. ही कार युरोपीय मॉडेलवर आधारित असून, दोन आसनी आहे. लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार एका पूर्ण चार्जमध्ये 63 किलोमीटर ते 192 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. वेगवेगळ्या बॅटरी पॅकच्या पर्यायासह ही कार उपलब्ध होऊ शकते, असा अंदाज आहे. ही कार भारतात एक लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तसे झाल्यास ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरू शकते.
- भारतातील बाजारपेठेत लिगियर मिनी ईव्ही G.OOD, I.DEAL, E.PIC आणि R.EBEL या चार प्रकारांमध्ये उपलब्ध केली जाऊ शकते. या कारमध्ये 4.14 kWh, 8.2 kWh आणि 12.42 kWh क्षमतेचे तीन बॅटरी पॅक पर्याय मिळण्याची शक्यता आहे.
- ही कार अनुक्रमे 63 किलोमीटर, 123 किलोमीटर आणि 192 किलोमीटरपर्यंतची रेंज एका चार्जमध्ये देऊ शकते. दरम्यान ही कार भारतात कधी लॉन्च होणार, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. येत्या काळात याबाबत अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.