देश - विदेश

पायलटचा मेसेज… काही सेकंदांची शांतता आणि मोठ्ठा स्फोट

  • गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर आज दुपारी एक मोठा विमान अपघात झाला. एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान AI-171 उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळले. हे विमान बोईंग 787 ड्रीमलायनर होते, ज्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह एकूण 242 प्रवासी होते.
  • दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर दोन मिनिटांनी विमानाचा विमानतळाच्या सीमेजवळ स्फोट झाला. एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ विमान कोसळले. विमानाने उड्डाण करताच पायलटने एटीसीला (एअर ट्रॅफिक कंट्रोल) मेडे कॉल दिला ‘आम्हाला मदत करा’, परंतु त्यानंतर विमानाशी कोणताही संपर्क झाला नाही. ‘मेडे कॉल’ हा विमानातील आपत्कालीन संदेश आहे. तो विमान गंभीर संकटात असताना आणि प्रवाशांच्या किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना पायलट देतो. 

Related Articles

Back to top button