महाराष्ट्र

ब्रेकिंग! लाडक्या बहिणींना महिला दिनाचे खास गिफ्ट

  • लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्र हप्ता येणार आहे. लाभार्थी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे तो कधी येणार याची प्रतिक्षा होती. यावर मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे.
  • महिला दिनाला लाभार्थी महिलांना मोठे गिफ्ट मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येणार आहेत. महिला दिनानिमित्ताने लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून गिफ्ट देण्यात येणार आहे. 8 मार्च रोजी दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत, अशी माहिती तटकरे यांनी दिली.
  • या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात. ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांचे अर्ज बाद होणार आहेत. तर काही महिलांनी स्वत:हून अर्ज मागे घेतल्याची माहिती तटकरे यांनी दिली.

Related Articles

Back to top button