क्राईम
लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी

- राज्यातील पर्यटक पावसाचा तसेच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोणावळा-खंडाळ्याला फिरायला जात आहेत. याच दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोणावळ्यात फिरायला आलेल्या महिलांमध्ये फ्री-स्टाईलने हाणामारी झाल्याचा हा व्हिडिओ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर येत आहे.
- महिलांमधील या गोंधळामुळे जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. उपस्थित नागरिक या महिलांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, महिला थांबल्या नाहीत. परंतु या महिला दारूच्या नशेत होत्या आणि त्यांना पोलिसांची भीती वाटत नव्हती. अखेर घटनास्थळी पोलीस आले तेव्हा हा वाद थांबला. ही घटना रविवारी घडल्याची माहिती आहे.
- व्हायरल व्हिडिओनुसार, लोणावळा परिसरातील जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर महिला एकमेकांशी भांडताना आणि केस ओढताना दिसत आहेत. यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत आहे. उपस्थित नागरिकांनी या महिलांना थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्यांनी कोणाचेच ऐकले नाही. अखेर लोणावळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि महिलांना पोलिस ठाण्यात नेले.



